जगाचे नैसर्गिक विभाग | The natural division of the world || marathi

जगाचे नैसर्गिक विभाग 

 

 

 


९ नैसर्गिक विभाग

  1. टुंड्रा प्रदेश
  2. सूचीपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश
  3. पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश
  4. गवताळ ( प्रेअरीज ) प्रदेश
  5. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश
  6. वाळवंटी प्रदेश
  7. सुदानी प्रदेश
  8. मोसमी हवामानाचा प्रदेश
  9. विषुववृत्तीय घनदाट अरण्यांचा प्रदेश

 

टुंड्रा प्रदेश –

शीत कटिबंध . ६० ° उत्तर अक्षवृत्त ते ८० ° उत्तर अक्षवृत्त . दक्षिण गोलार्धात असा प्रदेश नाही . हिवाळ्यात किमान तापमान ( – ) ४० सें . ग्रे . , उन्हाळ्यात कमाल तापमान १० सें . ग्रे . , पाऊस २५ सें . मी . हिमवर्षावाच्या स्वरूपात . ग्रीनलंड , कॅनडाचा उत्तर भाग , फिनलंड , सैबेरियाचा उत्तर भाग इत्यादी भाग या प्रदेशात मोडतो . या प्रदेशात एस्किमो , लॅप व सॅमॉईड हे लोक राहतात . सील व वालरस यांसारखे जलचर , पेंग्विन पक्षी व पांढरी अस्वले याच प्रदेशात आढळतात . फक्त उन्हाळ्यात शेवाळे , नेचे यांसारख्या वनस्पती उगवतात . 

 

सूचीपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश

समशीतोष्ण कटिबंध . ५० ° उत्तर ते ६६ उत्तर अक्षवृत्तांमध्ये . दक्षिण गोलार्धात असा प्रदेश नाही . मध्य कॅनडा , रशियाचा उत्तर भाग व सैबेरियाचा काही भाग या प्रदेशात मोडतो . तापमान किमान ( – ) ४० ° सें . ग्रे . , कमाल २१ सें . ग्रे . फर , पाईन , स्पूस , लार्च , हेमलॉक यांसारखे सूचिपर्णी वृक्ष . हे वृक्ष बुंध्याशी जाड व टोकाशी निमुळते असतात ; पाने सुईप्रमाणे निमुळती ; फळेही शंक्वाकृती . एल्क , कॅरिबू , सिल्व्हर फॉक्स , वीझल , बीव्हर हे प्राणी .

 

पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश

अक्षवृत्ते ४५० ते ६०० , उत्तर व दक्षिण दोन्ही गोलार्धात . समशीतोष्ण कटिबंध . मुख्यत्वे हिवाळ्यात पाऊस . एकूण पर्जन्यमान १५० सें . मी . पानझडी वृक्षांचा प्रदेश . बीच , ओक , पापलर , एल्म यांसारखे वृक्ष . ब्रिटन , उत्तर व पश्चिम युरोप , कॅनडाचा पश्चिम भाग , न्यूझीलंड वगैरे प्रदेश या विभागात येतात . हा विभाग औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून गायी , मेंढ्या , डुकरे यांसारखे पाळीव प्राणी व सधन शेतीमुळे भरभराटीस आलेला आहे . 

 

गवताळ ( प्रेअरीज ) प्रदेश

दोन्ही गोलार्धांत . ३० ते ५५ ° अक्षवृत्तांमध्ये . समशीतोष्ण कटिबंधात . पाऊस उन्हाळ्यात ५० सें . मी . पर्यंत . तापमान किमान ८ सें . ग्रे . , कमाल १ ९ ० सें . ग्रे . या प्रदेशास निरनिराळ्या भू – भागांत निरनिराळी नावे आहेत . उत्तर अमेरिकेत या प्रदेशास ‘ प्रेअरीज ‘ असे म्हटले जाते ; दक्षिण अमेरिकेत ‘ पंपास ‘ असे म्हटले जाते ; तर युरेशियात ‘ स्टेप्स ‘ , ऑस्ट्रेलियात ‘ डाऊन्स ‘ व आफिक्रेत ‘ व्हेल्ड ‘ असे संबोधले जाते . या प्रदेशात गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात . वृक्ष तुरळक . गव्हाचे प्रचंड उत्पादन . स्टेप्सच्या गवताळ प्रदेशात किरगीझ लोक राहतात . ‘ कुमीस ‘ हे त्यांचे आवडते पेय . त्यांच्या तंबूच्या घरास ‘ यूर्ट ‘ असे म्हणतात .

 

भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश

दोन्ही गोलार्धात ३० ते ४० ° अक्षवृत्तांच्या दरम्यान . समशीतोष्ण कटिबंधातील उबदार पट्टा . सौम्य हिवाळा . पश्चिमी वारे मध्यम पर्जन्य . भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश , कॅलिफोर्निया , मध्य चिली वगैरे भाग या प्रदेशात मोडतो . कमी उंचीचे वृक्ष , ओक व बूच ही झाडे . ‘ ऑलिव्ह’सारखी आंबटगोड फळे व गहू , जव , मका ही धान्ये . 

 

वाळवंटी प्रदेश

यास ‘ सहारा प्रकार ‘ असेही म्हणतात . दोन्ही गोलार्धात २० ते ३० ° अक्षवृत्तांच्या दरम्यान . तापमान किमान १० सें . ग्रे . , कमाल २ ९ सें . ग्रे . दिवसा अतिशय तप्त ; तर रात्री अतिशय थंड . पर्जन्य १० ते १२ सें . मी . दक्षिण अमेरिकेतील ‘ अटाकामा ‘ , आफ्रिकेतील ‘ सहारा ‘ व ‘ कलहारी ‘ , उत्तर अमेरिकेतील ‘ कोलोरॅडो ‘ , अरबस्तान , मध्य आशियातील ‘ गोबी ‘ व भारतातील ‘ थर ‘ ही वाळवंटे या प्रदेशात मोडतात . निवडुंग , बाभूळ यांसारखी काटेरी झुडपे व खुरटे गवत . मुख्य पीक खजूर . उंट हा महत्त्वाचा व उपयुक्त प्राणी . सहारा व अरबस्तानात ‘ बदाऊन ‘ हे भटके लोक राहतात .

 

सुदानी प्रदेश

५ ते १५ ° अक्षवृत्तांच्या दरम्यान . दोन्ही गोलार्धात . उष्ण कटिबंधात . मुख्यत्वे आफ्रिकेतील सुदान , पश्चिम युगांडा व पश्चिम टांझानिया हा भाग या प्रदेशात येतो . पाऊस उन्हाळ्यात ७५ सें . मी . पर्यंत . रुंद खोडाचे व छत्रीच्या आकाराचे वृक्ष . दोन ते सहा मीटर इतक्या उंचीचे गवत . गवतावर उपजीविका करणारे झेब्रा , जिराफ , रानबैल , पाणघोडे , गेंडे , हत्ती वगैरे प्राणी . त्याचबरोबर अशा प्राण्यांवर उपजीविका करणारे सिंह , वाघ , तरस यांच्यासारखी हिंस्र श्वापदे . या प्रदेशात ‘ झुलू ‘ व ‘ मसाई हे आफ्रिकन वंशाचे लोक राहतात . 

 

मोसमी हवामानाचा प्रदेश

५ ते ३० ° अक्षवृत्तांच्या दरम्यान , दोन्ही गोलार्धात . उष्ण कटिबंध , आग्नेय व दक्षिण आशियाचा भू – भाग या प्रदेशात मोडतो , भारताचा मोठा भाग याच प्रदेशात येतो . उन्हाळा , पावसाळा व हिवाळा असे तीन ऋतू . हिवाळा कोरडा व सौम्य . पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही . पाऊस मोसमी वाऱ्यांपासून . अनिश्चित स्वरूपाचा . किनारपट्टीत खूप पाऊस ; तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात अतिशय कमी , साग , साल , पळस , ऐन व खैर यांसारखे वृक्ष . रुंदपर्णी व पानझडी वनस्पती . 

 

विषुववृत्तीय घनदाट अरण्यांचा प्रदेश

५ ° उत्तर ते ५ ° दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान . वर्षभर उन्हाळा हा एकच ऋतू . पाऊस २०० सें . मी . सूर्यकिरण वर्षभर सरळ रेषेत ; त्यामुळे तीव्र तापमान , हवा ढगाळ . काँगो व ॲमेझॉन खोरे या प्रदेशात येते . घनदाट अरण्ये , सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नसल्याने वृक्ष उंच वाढतात . रबर , आंबा , महोगनी , सिंकोना , बांबू यांसारखी झाडे . प्रचंड नद्या . दलदल व रोगराई . अनेक प्रकारचे सर्प , विविध पक्षी , माकडे , रानडुकरे यांसारखे प्राणिजीवन . ‘ गोरिला ‘ हे माणसासारखे परंतु अजस्र माकड याच प्रदेशात आढळते . काँगोच्या खोऱ्यात ‘ पिग्मी ‘ जातीचे लोक राहतात .

BARC Recruitment 2022: Bhabha Atomic Research Centre मध्ये विविध पदासाठी एकूण 266 रिक्त जागा

BECIL Recruitment 2022, ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 378 जागांसाठी भरती

 
 
 
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published.