Table of Contents
basic information of earth – पृथ्वी in marathi
पृथ्वी – earth
( १ ) पृथ्वीचा ७१ टक्के भू – भाग जलव्याप्त असल्याने आकाशातून पाहिले असता पृथ्वी निळ्या रंगाची दिसते .
(२ ) पृथ्वीचा २ ९ टक्के पृष्ठभाग जमिनीने व्यापलेला आहे .
( ३ ) पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर विशिष्ट काल्पनिक वृत्ते व कटिबंध निर्माण होतात ; ऋतूंची निर्मिती होते व असमान दिवस व रात्री निर्माण होतात .
( ४ ) पृथ्वीवरील वातावरणामुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते . पृथ्वीवर वातावरण नसते तर ते काळ्या रंगाचे दिसले असते .
( ५ ) दिवस व रात्र यांचे अखंड चक्र पृथ्वीच्या परिवलनामुळे चालू राहते .
( ६ ) प्रकाशाचा वेग सेकंदास २ , ९९ , ७ ९ २ कि . मी . इतका असून सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर लक्षात घेता , सूर्यकिरणांना सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यास सुमारे ८ मिनिटे २० सेकंद इतका कालावधी लागतो . ( सूर्य पृथ्वीपासून १४ कोटी ९ ६ लक्ष कि . मी . अंतरावर आहे . )
( ७ ) लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असताना ३ जानेवारी या दिवशी पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते .
( ८ ) ‘ विषुववृत्त ‘ हे दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त आहे . सर्वांत मोठे अक्षवृत्त म्हणूनही विषुववृत्ताचा उल्लेख करावा लागेल ..
( ९ ) जसजसा अक्षांश वाढतो तसतशी अक्षवृत्तांची लांबी कमीकमी होत जाते .
( १० ) अक्षवृत्तांचे दोन्ही ध्रुवांवरील स्वरूप बिंदुमात्र असते .
( ११ ) सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवांशी एकत्र येतात .
( १२ ) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वात जास्त म्हणजे १११ कि . मी . इतके असते .
( १३ ) रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात .
( १४ ) उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव हे अक्षांश न देताही निश्चित करता येतात .
( १५ ) पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात जलव्याप्त प्रदेश जास्त असल्याने त्या गोलार्धास ‘ जल – गोलार्ध ‘ असे म्हणतात .
( १६ ) पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या गोलार्धास ‘ भू – गोलार्ध ‘ असे म्हणतात .